Sunday, December 5, 2021

Pet Clinic, Pune - Dr. K. R. Shingal

 






Qualification
Dr. K R Shingal, B. V, Sc. & A. A. H., M. V. Sc.(Mumbai), NDBP (IVR), FDA Approved  

Address
Akshay Nagar, Phase I,
Wing A, Flat No - 1, Vishal Nagar,
Pimple nilakh, Pune - 411 027, MH

Mobile: 9823059489, 8830602259

Youtube: Dr. Kunjilal Shingal ,
Dr. Kunjilal Shingal2,
Kunjilal Shingal

Facebook - Kunjilal Shingal

Facilities
Vaccination for all Dogs and Cats, Consultancy,
Treatment, Grooming, Training, General Checkup, Operation, Breeding

Services Available - 24 Hrs, if emergency please take prior appointment

Location - https://goo.gl/maps/r5X4EroG5UUTXKAb6

Thursday, April 8, 2021

देशी गीर गाय (A2 Milk & Ghee)

 

dairy farming, cow dairy farming


  • ऊन , पाऊस, थंडी वातारवणाचा देशी गौर गायीवर कसलाही परिणाम होत नाही.
  • दुधाचे प्रमाण ५ ते ७ लिटर,
  • शक्‍यतो कोणताही आजार होत नाही.
  • शरीराला आवश्यक असणारे सर्व पोषकतत्वे असतात.
  • देशी गायीला रोग प्रतिकार शक्‍ती जास्त असल्याने वैद्यकीय उपचाराची गरज पडत नाही.
 

A2 Milk: चे फायदे

 
  • दुधात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे अस्थिमज्जा संस्थेस (H.D.L.) बळकटी देते
  • रक्तातील चांगल्या चरबीचे प्रमाण वाढवते,
  • दुधातील प्रोटीन या घटकामुळे लहान मुले वृद्धांना   पचनास सुलभ व आरोग्यास गुणकारी.
  • अंत:स्रावी व बाहय-स्त्रावी ग्रंथींना निर्यामत करुन नॅचरल पेनक्युलर तयार करते.
  • व्हिटॅमिन D-3 भरपूर मात्रे असल्याने पाठदुखी, कंबरदुखी तसेच स्पौडेलेसिसवर उपयोगी.
 
देशी गीर गाईचे तूप
 
  • शरीराला लागणारी ऊर्जा ह्या तुपातून मिळते
  • हे तुप ववृद्धत्वाची प्रक्रिया कमी करते.
  • ह्या तुपातून व्हिटॅमिन A2, E, D,  जीवनसत्व मिळते.
  • A2 व्हिटॅमिन, तुटलेली हाडे जोडण्याचे काम करते.
  • या पध्दतीने बनविलेले तुप खराब कोलेस्ट्रॉल कमी करते.
  • लठ्ठपणामुळे ग्रस्त असणा-याला A2 गायीचे तूप अतिशय उपयुक्‍त आहे.

Wednesday, March 31, 2021

Bajirao Jadhav, IAS(Retd), Sec.Gad, Mantralaya, Mumbai felicitated by Sunil Gaikwad, Vedantshee, Pune

Video Link:- https://youtu.be/7Pe4bFRdYMA

Description:- Bajirao Jadhav, IAS(Retd), Sec. GAD, Mantralaya, Mumbai felicitated by Sunil Gaikwad, Vendant Publications, Dr.V.M.Bhukatar, Former VCI, Member, Former Deputy Commissioner of Animal Husbandry, Govt of Maharashtra State, Dr.K.R.Shingal, Former Regional Joint Commissioner of Animal Husbandry Govt of Maharashtra State, Presently Inquiry officer, Govt of Maharashtra State, India

Place: Vendant Publications, Pune, India Date: 30.03.2021

Tuesday, March 30, 2021

Dr. K. R. Shingal, Pune

 






वयाच्या 45/ 55 / 65 नंतरचा काळ आनंदात घालवायचा असेल तर....


त्यासाठी 12 नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना अनेक मंडळींची मदत झाली आहे. यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील._ 

हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, लक्षात ठेवावेत व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. 

1) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट, मेहेनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. है पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याएवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते. 

धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्य- दिव्य, आकर्षक किंवा ‘फुल फ्रूफ’ असो. त्यामूळे कदाचीत तुमच्या समस्या व टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शन विरहीत व शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामूळे या वयात गुंतवणुक करू नये.

2)  तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजीबात चिंता करू नका. तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला मुळीच कमीपणा मानू नका. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतकी वर्षे संभाळले, त्यांना अन्न-वस्त्र-निवारा दिलात. चांगले शिक्षण दिलेत. आता त्यांना लागणारे पैसे त्यांना कमवू द्यात. 

3) आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेत चला. यासाठी झेपेल एवढाच व्यायाम नियमीतपणे करा. उगीचच्या उगीच जिमला जाणे, तासंतास पळणे, तासंतास योगासने करणे किंवा प्राणायाम करणे यासाखे अघोरी व्यायाम करू नका. चांगले खा, भरपूर झोप काढा. नियमीतपणे वैद्यकीय तपासणी करून घेत चला व आपल्या डॉक्टरच्या संपर्कात रहा. तसेच आपल्याला लागणारी नियमीत औषधे सतत जवळ बाळगत चला. कारण नसताना डॉक्टर्सच्या जाळ्यात अडकू नका किंवा औषधांच्या व्यसनात गुरफटू नका.

4) तुमच्या जोडीदाराची काळजी घेत चला. त्यांच्यासाठी उत्तमोत्तम वस्तु व प्रेझेन्ट्स आणत जा. कारण एक ना एक दिवस तुमच्यातील एकजण आधी जाणार आहे याची जाणीव ठेवा. हाती असलेला पैसा दोघांनी मिळून इन्जॉय करा. कारण एकट्याने पैसा इन्जॉय करणे कठीण असते. 

5) छोट्या छोट्या गोष्टींवरून उगीच डोक्याला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आयुष्यात पुष्कळ उन्हाळे पावसाळे बघीतले आहेत. तुमच्या मनात काही सुखी आठवणी आहेत तर काही दुःखी, मनाला यातना देणार्याा आठवणी पण आहेत. पण लक्षात ठेवा, तुमचा ‘आज’ सर्वात महत्वाचा आहे. त्यामूळे भूतकाळातील वाईट आठवणींमूळे, तसेच भविष्यकाळातील चिंतेमुळे तुमचा ‘आज’ खराब होऊ देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी आपोआप सरळ होतील.

6) तुमचे वय काहिही असो, प्रेम करायला शिका. तुमचा जोडीदार, तुमचे कुटुंब, तुमचे शेजारी, तुमचे आयुष्य यावर प्रेम करायला लागा. लक्षात ठेवा जोपर्यंत माणसाची बुद्धी शाबूत असते व मनात प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस वृद्ध होत नसतो. 

7) स्वतःविषयी अभीमान बाळगा. तो अंतरबाह्य असुदे. वेळच्यावेळी कटींग सलूनमध्ये जाऊन केस कापून घ्या. डेन्टिस्टकडे जा. आवडत्या पावडरी, पर्फ्युम्स वापरायला संकोच करू नका. कपडे निटनेटके ठेवा. बाहेरून तुम्ही जितके चांगले रहाल तेवढे आतून समाधानी असाल. 

8) तुम्हाला फॅशन करायची असेल तर खुषाल करा. वृद्ध मंडळींसाठी नवीन फॅशन्स काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही थोडे फॅशनेबल राहिलात तर तरुणांना सुद्धा आवडाल. 

9) आपले ज्ञान व माहिती अद्ययावत ठेवा. वर्तमानपत्रे वाचत जा. टि. व्ही. वरील बातम्या बघत जा. सोशल नेटवर्कींग साइटचे सभासद व्हा. तुम्हाला कदाचीत तुमचे जुने मित्र किंवा मैत्रीणी परत भेटतील. कनेक्टेड रहा. यामधे पण मोठा आनंद आहे. 

10) तरुणांचा व त्यांच्या मतांचा आदर करा. कदाचीत तुमच्या व त्यांच्या विचारात फरक असू शकेल. पण तेच उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सल्ला द्या, मार्गदर्शन करा आणि ते सुद्धा त्यांनी मागीतले तरच. उगीच च्या उगीच त्यांचेवर टिका करू नका किंवा त्यांचे दोष काढत बसू नका. कालच्या शहाणपणाला आजच्या जगातही तेवढेच महत्व आहे याची त्यांना जाणीव करून देत चला. 

11) ‘आमच्या वेळी असे होते, आमच्यावेळी तसे होते’ असे शब्दप्रयोग अजीबात करू नका. कारण तुमची वेळ आत्ताची आहे, कालची नव्हे. त्यामूळे काल काय घडले हे सतत तोंडावर फेकून मारत जाऊ नका. आत्ताचे आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा विचार करा. 

12) बहुतेक मंडळी वृद्धत्व आले म्हणून रडत बसतात. फारच थोडी मंडळी वृद्धत्वाचा आनंदाने स्विकार करतात. आयुष्य फार छोटे आहे. त्यामूळे असे करू नका. नेहमी आनंदी लोकांच्या संगतीत रहाण्याचा प्रयत्न करा. त्यामूळे तुम्हालाही आनंद वाटेल. निराश, दुःखी, रड्या लोकांपासून दूर रहा. लक्षात ठेवा दुःखी व रडी माणसे कोणालाच आवडत नसतात. आनंदी व चिअरफूल माणसेच लोकांना आवडत असतात..

🙏🙏🙏🙏🙏🙏

Bajirao Jadhav, IAS (Retd), Sec, GAD, Mantralaya, Mumbai, India

 https://youtu.be/plKEusShj54