प्राध्यापक डॉ. डी. बा. सरोदे डॉ. कु. रु. शिंगल
प्राध्यापक आणि अधिष्ठाता सेवा निवृत्त प्रादेशिक सह आयुक्त
महाराष्ट्र पशु, व मत्स्य विज्ञान पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य,
विद्यापीठ, नागपूर (सेवानिवृत्त)
पशुधनाचे मुख्यत्व तीन प्रकार आपल्या भागात बघण्यास मिळतात. ज्यामधे व्यावसाईक पशुपालन करणाऱ्यांची संख्या फारच तोकडी आहे. या प्रकारात शेतजमीनीचा वापर मुख्यत्वे चारा पिकांसाठी केला जातो. या पदध्दतीत सुरुवातीस लागणारी गुंतवणूक थोडी जास्त असली तरी सुध्दा उत्पादनक्षम जातींच्या उचित निवड व संगोपनाद्दारे अधिकाअधिक फायदा शक्य होतो. अल्पभुधारक शेतकरी आपल्या शेतजमीनीतील काम आटोपुन मोठया अथवा आर्थिकदृष्टया सक्षम शेतकऱ्यांकडे मोलमजुरी करून आपली उपजिविका भागवितात. त्यास जोड म्हणून कुटुंबातील स्त्रिया व अल्प प्रमाणात गोपालन अथवा शेळीपालन करतात. निकडीच्या वेळी या पशुधनाचा उपयोग आर्थिक गरज भागविण्यासाठी केला जातो. या प्रकारचे पशुपालन करताना माळरान, जमीन, डोंगराळ व खडकाळ भागातील झुडपी जंगलांचा वापर जनावरे चारण्यासाठी केला जातो. अशा पशुपालनात गुंतवणूक व फायदे हे दोन्ही अत्यल्प असतात. या पदध्दतीला शास्त्रीय भाषेत Extensive Fasining असे संबोधतात.
जमीन, पशुधन, मनुष्यबळ आणि आर्थिक गुंतवणूक ही ग्रामीण भागातील उत्पन्न मिळविण्यासाठी लागणारी प्रमुख संसाधने होय. ही संसाधने प्रथमत: अन्नधान्य पिकविण्यासाठी, कच्चा माल पुरविण्यसाठी व अन्य मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी वापरली जातात. शेतकर्यांकडे असणारे पशुधन हे त्याच्याच शेतातील बांधावर, झुडुपावर आपला चारा मिळवितात पशुपालकांचा फार मोठा गट या शेतीवर अवलंबून आहे. याला शास्त्रीय भाषेत ................. संबोधतात. पारंपारिक उत्पादन उदा. कडबा, तणस, कोंडा, गव्हांडा इत्यादी उत्पादने उपलब्ध पशुधनासाठी चारा म्हणून वापरले जातात. तसेच पशुधनापासून मिळणारे बैल शेतीकाम करण्यासाठी खत शेतजमीनीची प्रत सुधारण्यासाठी आणि अल्प प्रमाणात मिळणारे दुध व मांस हे आधि कुटूंब पोषणासाठी व थोडया प्रमाणात आर्थिक मदतीसाठी वापरले जाते.
व्यवसाईक पशुपालनाचा अभाव, पारंपारिक पध्दतींचा अवलंब, बाजारपेठेविषय नसलेली जागरुकता व उन्नत शास्त्रीय ज्ञानाकडे केला जाणारा कानाडोळा हे आजच्या वैदर्भीय पशुधनाचे व व्याहुनही अधिक शेतकऱ्यांच्या आणी पशुपालकांच्या दशेचे कारण आहे. प्रश्न ४ ) विदर्भातील जोडधंदयामध्ये सक्षमता आणण्याकरीताचे नियोजन पशुपालनाचा शब्दश: अर्थ म्हणजे मनुष्याने स्वत:च्या फायदयासाठी केलेले पशुच्चू संगोपन असा होतो. जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी प्रत्येक पशुपालकाने आपण पशुपालन कशासाठी करायचे? हा प्रश्न स्वतःला विचारणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उपलब्ध साधन संपत्ती, आर्थिक गुंतवणूक, मनुष्यबळ आणि बाजारपेठ यांचा अभ्यास असलेला बरा. आजची जनावरे ही हजारो वर्षापासून होत आलेल्या जनुकीय उत्क्रांतीचे फलीत आहे. पण मानवी हस्तक्षेपामुळे अथवा नियोजनाच्या अभावामुळे जातीवंत जनावरांची वंशावळ ही अफायदेशीर Non Discovipt होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे आपल्या भागात आढळणाऱ्या उत्तम प्रतीच्या जातीवंत जनावरांचा पशुपालनासाठी वापर केल्यास
पशुपालनासाठी लागणाऱ्या Input पेक्षा त्यापासून मिळणारे Output कधीही फायदेशीर राहील. उदाहरण द्यायचे झाल्यास कुकुटपालन उद्योग लक्षात घेता. दारिद्रयरेशेखालील कुटुंबांना परसबागेतील कुक्कूटपालनासाठी प्रेरीत करावे लागेल. भारतात देशी जास्तीचे उत्पन्नाचा खर्च नगण्य असून त्यासाठी असणारी बाजारपेठही उत्तम आहे. परसबागेतील कुक्कूटपालनासाठी टाकाऊ पदार्थ अथवा स्वंपाकघरातील कचरा उपयोगी ठरतो. त्यामुळे दिवसागणीक वाढणाऱ्या कुक्कूट खाद्यावरील खर्चावर मात करून दारिद्रय निर्मुलनासाठी यातून मिळणारे उत्पन्न उपयोगी ठरते.
जे कुक्कूटपालन थोडया मोठया प्रमाणात कुक्कूट संगोपन करू शकतात अशा कुक्कूटपालकांसाठी वनराज, गीरिराज, ग्रामप्रिया व तत्सम पक्षी उपयोगी ठरतात या प्रकारच्या संगोपनामध्ये थोडया प्रमाणात पुरविलेले संतुलित खाद्य अधिकाअधिक नफा मिळवून देते. व्यावसायिक कुक्कूटपालन हे आज सर्व परीचित आहे. व्यावसायिक कुक्कूटपालन करतांना सुमारे ७०% हा खर्च कुक्कूट खाद्यावर होतो. अपारंपारिक खाद्य घटकांचा कुक्कूट खाद्यात वापर झाल्यास या ७०% मधील वाचणारी \रक्कम ही मिळणाऱ्या नफ्यावर अधिकचा फायदा ठरेल.
सेंद्रीय कुक्कूटपालानाचे निर्बंध अटी इत्यादी लक्षात घेता शेडवर होणारा खर्च, पिंजरे व इतर स्थिर वस्तुंवर होणारा खर्च कमी आहेत. तसेच सेंद्रीय उत्पादनांना चांगली बाजारपेठ व वाढती मागणी असल्याने यामध्ये केलेली गुंतवणूक उपयोगी ठरते.
वैक्ल्पीक (पक्षीपालन) कुक्कूटपालन ही संकल्पना आता शेतकऱ्यांना माहित होत आहे. अशा कुक्कूटपालनामध्ये कुक्कूटपालनासाठी असणार विविध विकल्प म्हणजेच बटेर, इमु, बदक, टर्की, गितीफाडला यापैकी विदर्भामध्ये मुख्यत्वे बटेरपालन, इमुपालन व भंडारा, चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदीया यासारख्या जिल्हयामध्ये बदकपालन हा उपयुक्त पर्याय उपलब्ध आहे. याचप्रकारे दारिद्रयरेषेखालील व जमीन धारणा कमी अथवा नसलेल्या शेतकऱयांना आपल्या विभागातील उत्तम प्रतिच्या गवरान गाईचे पालन केल्यास त्यातून येणाऱ्या बैल जोड्यांद्वारे व दुग्धोत्पादनाद्वारे कमी खर्चीत अधिक फायदा होऊ शकतो.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना जर्सी, सहीवाल संकर जनावरे उत्तम संमिश्र शेतीसाठी उपयुक्त ठरतात. शेतीपासून मिळणारा कडबा, कुचर व अल्प प्रमाणात केलेली चारा पीकांची लागवड उत्तम उत्पादनाचा स्त्रोत ठरू शकते. व्यावसायिक दुग्धोत्पादन करण्यासाठी उत्तम प्रतिच्या H.F. गायी, जर्सी, संकर जनावरे उपलब्ध आहेत. त्याचप्रकारे भारतात मुऱ्हा, सुरती, नागपुरी, यासारख्या उच्च प्रतिच्या दुधाळ जनावरांची उपलब्धता असल्याने भरपूर पर्याय दुग्धोत्पादन करणाऱ्या व्यावसायिक पशुपालकांकडे उभे रहातात.
शेळीला गरीबाची गाय असे म्हणतात. आपल्या भागात बेरारी शेळीची जात प्रसिध्द आहे. त्याचप्रमाणे उस्मानाबादी शेळी ही विदर्भातील परिस्थितीमध्ये उत्तमरित्या तग धरु शकते. शेळीपालन करण्यासाठी अर्धनदीस्त अथवा मुक्त संचार पदध्दतीचा वापर प्रामुख्याने होतो. पारंपारिक शेळीपालन करणाऱ्या पशुपालकांना सुरुवतीचा खर्च हा फक्त शेळया आणण्यापुरताच मर्यादित रहातो.
मोठया प्रमाणात शेळीपालन हा व्यवसाय म्हणून करायचे झाल्यास अर्धबंदीस्त पध्दतीचा अवलंब केलेला उत्तम यामध्ये पशुपालकांना शेळीच्या खाद्यावर आण चाऱ्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. भरपूर उत्पादन देणार्या जनावरांच्या आहाराला अन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मनुष्य प्राण्या प्रमाणेच उत्पादनक्षम जनावरांना उचित प्रमाणात कार्बोदके, प्रथीने, स्निग्ध पदार्थ व इतर पोषक द्रव्याची आवश्यकता असते. सर्व उत्पादनक्षम प्राणी त्यांनी घेतलेल्या आहाराचा मुख्यत्वे तिन प्रकारे उपयोग करतात.
१. शरीर जोपासने करीता
२. शरीर वाढीकरीता
३. दुग्ध, मांस व उंडी उत्पादनाकरीता
या सर्व घटकांमध्ये एक स्पर्धात्मक तुलना असते व प्रथम दोन गोष्टींसाठी आळाचा वापर मुख्यत्वे केला जातो व त्यावरच उत्पादन क्षमता अवलंबून असते. वाढत्या महागाईबरोबरच अन्नधान्य तसेच पशुसाठी लागणाऱ्या खुराकीच्या किंमती वाढल्या आहेत. स्थानिक धाब्यापासून, कडधान्यापासून व उद्योगधंद्यातील उपयोगी By-product चा वापर केल्यास त्यामध्ये लागणारा खर्च कमी करता येईल. संमिश्र शेती करणाऱ्या शेतकऱयांन तर लुसर्ण, बरसीम याप्रकारच्या प्रथिनयुक्त चारा पीकांची तसेच जयवंत व यशवंत या प्रकारच्या चारा पीकांची लागवड केली तर उत्पादनक्षत जनावरांना संतुलित आहार पुरवीने सुकर होईल. शास्त्रोक्त पध्दतीने तयार केलेली मुरघास व भुसा, तुस, कोंडा, कुटार यासारख्या टाकाऊ पदार्थांवर केलेली युरीया ट्रिटमेंट पशुधनासाठी उत्तम प्रतीचा चारा सर्व क्रतुंमध्ये उपलब्ध करून देईल.
विदर्भातील विषय परिस्थितीमुळे येथे Seasonal Breeding चे प्रमाण मोठया प्रमाणात आढळते. आंतर व बाहय परजीवी तसेच कृमी जनावरांच्या तब्येतीवर परीणाम करतात. अशक्त जनावरे रोगांना सहज निमंत्रण देतात. परीणामी उत्पादकता ढासळून आर्थिक नुकसान संभवते. पशुपालनास शास्त्रीय ज्ञानाची जोड लाभल्यास त्याला फायदेशीर आणि सुकर बनविता येते. पारंपारिक वैदुंना व जादुटोण्याला आळा घालून आपल्या जनावरांच्या वेळोवेळी तपासण्या व रोग निधान केल्यास योग्य वेळी उपचार करून होणारी ........... पुढील वंशाकरीता केलेली जनावरांची योग्य निवड अथवा सिध्द जनावरांपासून मिळणाऱ्या विर्याने केलेले कृत्रिम रेतन हे आपल्या वातावरणात उपयुक्त असलेल्या उत्तम प्रजाती निर्माण करण्यास फायदेशीर ठरेल.
दुध, मांस, लोकर, अंडी, चामडे व तत्सम पशुजन्य पदार्थाचा बाजारभाव व त्यापासून तयर होणाऱ्या वस्तुंचे बाजारभाव बघता मोठी तफावत आढळून येते. विकसनशील उद्योगप्रीय व उद्योन्मुख तरुणांना अशा कच्च्या मालावर प्रक्रियेचे तंत्र अवगत झाल्यास आर्थिक प्रगती साधता येईल्. आजच्या सुपर मार्केटच्या सुगामध्ये प्रक्रिया आणि पॅकेजींगला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या सर्वांचे ज्ञान सुशिक्षित बेरोजगार ग्रामीण तरुणांपर्यंत पोहचल्यास आर्थिक उन्नतीची पाय उभारणी करण्यास मदत होईल.
भारत सरकारच्या विविध दारिद्रय निर्मुलन कार्यक्रमांमध्ये पशुपालन व त्यावर आधारित व्यवसायांवर भर दिला आहे. यातच संकरीत गोपालन या व्यवसायाने आपले महत्त्व सिध्द केले आहे. विदर्भातील ग्रामीण जनतेने पुशपालनास व्यावसाईक दृष्टीकोनाने बघितले तर हा व्यवसाय आर्थिकदृष्टया दुर्बल जनतेला सहज रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम आहे. शेती बरोबर पशुपालनाचे समायोजन केल्यास काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्येचे समाधान मिळू शकेल.
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागात पशुवैधकीय अधिकारी, पशुधन पर्यावेक्षक नियुक्त केले असून त्यांच्या सेवांचा व शास्त्रीय ज्ञानाचा पुरेपर उपयोग केल्यास पशुधनांसंबंधी जागृती निर्माण होण्यास फारसा वेळ लागणार नाही. त्याचबरोबर महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यीपीठ व त्याअंतर्गत येणाऱ्या संस्था, विद्यालये शास्त्रीय माहिती पुरविण्साठी सदैव प्रयत्नशील आहेत.
Friday, January 15, 2021
जोडधंदयाचे प्रकार व पशुपालकाच्या दशेचे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment