चौकशी अधिका-याची प्रामुख्याने तीन कार्य असतात.
1. चौकशी प्रकरणात लेखी व तोंडी पुरावा नोंदवुन घेणे
2. तोंडी व लेखी पुराव्याचे मुल्यमापन करणे
3. अपचा-याविरुध्दचा प्रत्येक दोषारोप सिध्द झाला आहे किंवा नाही याबाबतीत निष्कर्ष व त्याची कारणे देणे.
चौकशी अधिका-यातर्फे केली जाणारी चौकशी अर्धन्यायिक असते तेव्हा अपचारी कर्मचा-याला त्याच्या विरुध्दच्या दोषारोपाच्या संदर्भात त्याचे म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देणे आवश्यक आहे. अशी संधी न दिल्यास, नैसर्गिक न्यायाच्या तत्वांची पायमल्ली होईल व या कारणास्तव संपुर्ण चौकशी प्रकरणातील सर्व वस्तुस्थिती आकलन होण्याच्या उद्देशाने अपचा-याला प्रश्न विचारण्याची चौकशी अधिका-यास मुभा असते. मात्र चौकशी अधिका-यास उलटपासणी करण्याचा अधिकार नाही.
चौकशी अधिका-याने विभागीय चौकशीच्या प्रकरणातील पुराव्यांची छाननी स्वतंत्रपणे करणे गरजेचे असते.तसेच प्रकरणातील सर्व परिस्थिती व घटना विचारात घेवुन तर्कसंगत अनुमान काढले पाहिजे. विभागीय चौकशी प्रकरणात इंडिया एव्हीडंस ॲक्ट मधील पुराव्यासंबंधीच्या तरतुदी लागु होत नाहित. प्रकरणातील घटनांची शक्यता लक्षात घेऊन निष्कर्ष काढावयाचे असतात. मात्र चौकशी अधिकारी हा फौजदारी न्यायालयातील सरकारी वकील नसतो, व अपचा-याविरुध्दचे दोषारोप काहीही करुन सिध्द करण्याची त्याची जबाबदारी नसते हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. अपचारी हा देाषी आहे असे चौकशी अधिका-याने समजता कामा नये.
चौकशी अधिक-याने चौकशी करताना करावयाच्या(Dos)
तसेच टाळायच्या गोष्टी
(Donts) पुढे नमुद केल्या आहेत.
करावयाच्या गोष्टी (Dos)
1.
चौकशी अधिका-याच्या नेमणुकीच्या आदेश अधिकार असलेल्या शिस्त भंगविषयक प्राधिका-योने योग्य त-हेने काढला आहे हे तपासुन घ्या.
2.
नेमणुकीच्या आदेशासोबत खालील कागदपत्रे मिळाली आहेत किंवा नाही याची खात्री करा.
अ) दोषारोप पत्र (Charge Sheet), दोषारोपांचे विवरणपत्र (Statement of Allegations)
ब) शासकिय कर्मचा-योन बचावाचे लेखी निवेदन दिले असल्यास त्याची प्रत.
क) ज्यांच्या आधारे दोषारोप सिध्द करावयाचे योजिले असेल त्या कागदपत्रांची यादी व साक्षीदारांची यादी.
ड) साक्षीदारांच्या यादीतील साक्षीदारांनी प्राथमिक चौकशीच्या वेळी दिलेल्या जबाबाच्या प्रती.
इ) दोषारोपपत्र, दोषारोपांचे विवरणपत्र, कागदपत्राची व साक्षीदारांची यादी अपचा-यास दिल्याचा पुरावा
ई) सादरकर्ता अधिका-याच्या नेमणुकीच्या आदेशाची प्रत
3.
प्राथमिक तसेच नियमित सुनावणीच्या नोटीसा अपचा-यास प्रत्यक्षपणे अथवा रजिस्टर पोस्टाने (पोहोच पावतीसह) पाठविल्या जातील हे पहा.
4.
प्राथमिक सुनावणीच्या वेळी अपचा-यास व सादरकर्ता अधिका-यांस चौकशीची कार्यपध्दती समजावुन दया.
5.
अपचारी व सादरर्ता अधिकारी यांच्याशी चर्चा करुन चौकशीच्या विविध टप्यांवरील तारखा ठरवुन घ्या जेणेकरुन चौकशी ठराविक काळात पुर्ण करता येईल.
6.
पत्रातील आरोप मान्य आहेत का याची खातरजमा अपचा-याकडुन करुन घ्या. दोषारोप मान्य असतील तर अपचा-याचा तसा जबाब नोंदवुन त्यावर त्याची सही घ्या. मान्य असतील अशा दोषारोपांची चौकशी करावयाची नाही व त्या दोषारोपांच्या सिध्दतेाबाबतचे आपले निष्कर्ष विवरणासह शिस्तभंगाविषयक प्राधिका-याकडे पाठवायचे आहेत, हे ध्यानात ठेवा. नियम 8 (9)
7.
अपचा-यास त्याच्या मुख्यालयातील किंवा चौकशी घेण्यात येईल त्या ठिकाणच्या कोणत्याही कार्यालयातील, ज्याच्याकडे याआधीच घेतलेली शिस्तभंग प्रकरणे तीनपेक्षा कमी आहेत, अशा शासकीय कर्मचा-याची बचाव सहाय्यक म्हणुन नेमणुक करता येते याची अपचारी कर्मचा-यास कल्पना दया.
प्रकरणातील परिस्थिती लक्षात घेऊन आणि लेखी कारणे नमुद करुन तुम्ही संमती दिली तरच अपचारी कर्मचा-यास इतर ठिकाणच्या कोणत्याही कर्मचा-यास (ज्याच्याकडे याआधीच घेतलेली शिस्तभंग प्रकरणे तीन पेक्षा कमी आहेत) बचाव सहाय्यक म्हणुन नेमता येईल अन्यथा नाही. शासनाने वेळोवेळी काढलेल्या आदेशातील विनिर्दिष्ट केलेल्या शर्तीला अधीन राहुन अपचारी कर्मचा-यास सेवानिवृत्त शासकिय कर्मचा-यास बचाव सहाय्यक म्हणुन नेमता येते. नियम 8
(8 अ) अपचारी कर्मचा-याने बचाव सहाय्यक म्हणुन नेमलेल्या कर्मचा-यांचे नाव, हुद्दा, कार्यालयीन पत्ता याची नोंद करुन घ्याम्हणजे त्यास योग्य वेळी नोटीस पाठविता येईल.
8.
सादरकर्ता अधिकारी विधीव्यवसायी असेल तर अपचारी कर्मचा-याला विधीव्यवसायी यांचे सहाय्य घेता येते. तसेच प्रकरणातील वस्तुस्थिती लक्षात घेऊन विधीव्यवसायी यांचे सहाय्य घेण्याची परवानगी फक्त शिस्तभंगविषयक प्राधिकारीच देऊ शकतात, याची अपचारी कर्मचा-यास कल्पना दया. जेणेकरुन अपचारी कर्मचारी जरुर तर शिस्तभंगविषयक प्राधिका-याकडे परवानगी मागु शकेल. नियम 8
(8 अ)
नियम 8
(ब) मधील तरतुदीनुसार अपचारी कर्मचा-याला शासनाने निर्दिष्ठ केलेलया अशा शर्तीना अधीन राहुन, त्याच्या वतीने प्रकरण सादर करण्यासाठी सेवा निवृत्त शासकिय कर्मचा-याची मदत घेता येते शासनाने दि.
7.10.2015 च्या परिपत्राप्रमाणे खालील अटी व शर्ती विहित केल्या आहेत. सदर परिपत्रक (अ.क्र.13)
या पुस्तकात उपलब्ध आहे.
A.
असा सेवानिवृत्त कर्मचारी राज्य शासनाच्या सेवेतुन निवृत्त झालेला असला पाहिजे. मात्र त्याच्या विरुध्द सेवेत असताना सेवानिवृत्तीनंतर कोणतीही विभागीय चौकशी झालेली नसावी/ प्रस्तावित नसावी आणि अशा कार्यवाहीच्या अनुषंगाने त्याला कोणतीही शिक्षा झालेली नसावी.
B.
अशा सेवानिवृत्त कर्मचा-याचा प्रवास भत्ता, दैनिक भत्ता इ. खर्च अपचारी कर्मचा-यास स्वत: करावा लागेल.
C.
बचाव सहाय्यक म्हणुन काम करणा-या व्यक्तीने चौकशीच्या तारखांना व ठिकाणी वेळेवर हजर राहिले पाहिजे. याबाबतची जबाबदारी अपचारी कर्मचा-याची असेल.
D.
अशा सेवानिवृत्त शासकिय कर्मचा-यांच्या संबंधित प्रकरणाशी चौकशीच्या कोणत्याही टप्यात अथवा त्याच्या अधिकृत कामाचा भाग म्हणुन कोणत्याही प्रकारे संबंध आलेला असता कामा नये.
E.
अशा सेवानिवृत्त शासकिय कर्मचा-यास एकाच वेळी जास्तीत जास्त पाच प्रकरणांमध्ये बचाव सहाय्यक म्हणुन काम करता येऊ शकेल. त्यांच्याकडे पाचपेक्षा जास्त प्रकरणे नाहित याबद्दल त्यांनी चौकशी अधिकारी यांच्याकडे प्रतिज्ञापत्र दिले पाहिजे.
9.
पत्रांसोबत दिलेल्या कागदपत्रांच्या यादितील कागदपत्र सादरकर्ता अधिकारी यांना सादर करणेस भाग पाडा. सादर केलेली कागदपत्रे अवलोकन करण्यासाठी, अपचा-यातर्फे तपासावयाच्या साक्षीदारांची यादी सादर करण्यासाठी, व कागपत्रांच्या यादीत नमुद नसलेली कागदपत्रे सादर करावीत म्हणुन नोटीस देण्यासाठी जास्तीत जास्त
10 दिवसांपर्यतची मुदत द्या. नियम 7
(11 एक)
10.
दोषारोपपत्रात किंवा गैरवर्तणुकीच्या विवरणपत्रात ज्या कागदपत्रांचा उल्लेख केला आहे अशी कागदपत्रे अपचा-यास पहावयास दया. इतर कागदपत्रांची अपचा-याने मागणी केल्यास, सदर कागदपत्रे प्रकरणाशी संबंधित आहेत का हे तपासुन घ्या. कागदपत्रे संबंधित असतील तर सदर कागदपत्रे सादर करण्यास संबंधितांना सांगा. प्रकरणाशी संबंधित नसलेल्या कागदपत्राची मागणी नाकारा व नाकारण्याची कारणे लेखी स्वरुपात नमुद करा.
11.
दोषारोपपत्रांसोबत दिलेल्या साक्षीदारांच्या यादीतील साक्षीदारांच्या प्राथमिक चौकशीतील जबाबाच्या / निवेदनाच्या प्रती संबंधित साक्षीदारांच्या तपासणीच्या तारखेपुर्वी कमीत कमी 3
दिवस अपचा-याला दिल्या जातील असे पहा. नियम 8 (12)
12.
साक्षीदारांना हजर राहण्यासाठी समन्स पाठवा व त्यांना ते पोहोचेल असे पहा. शासनाने प्राधिकृत केल्याशिवाय तुम्हाला साक्षीदारांना चौकशीच्या संदर्भात हजर राहण्यास भाग पाडता येणार नाही हे ध्यानात असु दया.
13.
अपचा-यास/साक्षीदारस शपथ देण्याचा चौकशी अधिका-यास अधिकार नाही. हे ध्यानात ठेवा.
14.
तपासणी व उलट तपासणी अपचा-यास विचारलेल्या प्रश्नांची त्योन उत्तरे देण्यापुर्वी त्यास प्रश्न समजले आहेत याची खात्री करा.
15.
साक्षीदाराची साक्ष पुर्ण झाल्यानंतर साक्षीतील निवेदन (अभिसाक्ष) साक्षीदाराला, शासकिय कर्मचा-याला / बचाव सहाय्यकाला वाचुन दाखवा व अभिसाक्षीला अखेरीस पुढील प्रमाणपत्र अभिलिखीत करुन त्यावर स्वाक्षरी करा. आरोपीच्या उपस्थितीत साक्षीदाराला वाचुन दाखवली व त्याने ती अचुक असल्याचे मान्य केले/ साक्षीदाराचा आक्षेप अभिलिखीत केला.
16.
अभिसाक्षीच्या प्रत्येक पृष्ठावर साक्षीदारास सही करण्यास सांगावे आपणदेखील सही करा. साक्षीदाराने अभिसाक्षीने सही करण्यास नकार दिला तर सदर गोष्ट नमुद करुन सही करा. साक्षीदाराच्या अभिसाक्षीवर शासकिय कर्मचा-याची किंवा त्याच्या बचाव सहाय्यकाची सही घ्या.
17.
साक्षीदाराची तपासणी उलटतपासणी व फेरतपासणी झाल्यानंतर चौकशी अधिकारी साक्षीदाराला योग्य वाटतील असे प्रश्न विचारु शकतात.
18.
शिस्तभंगविषयक प्राधिका-याची बाजु मांडण्याचे काम संपण्यापुर्वी अपचा-यास दिलेल्या कागदपत्रांच्या व साक्षीदारांच्या सुचित समाविष्ठ नसलेला पुरावा सादरकर्ता अधिका-यास चौकशी अधिका-यांच्या संमतीने सादर करता येईल. मात्र नवीन पुरावा सादर करण्यापुर्वी कमीत कमी तीन दिवस कागदपत्रे पाहण्याची व नवीन साक्षीदारंचे नाव अपचा-यास कळविले जाणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही साक्षीदाराला पुन्हा बोलावुन त्याची फेरतपासणी करण्यासाठी, चौकशी अधिकारी, सादरकर्त्या अधिका-यास परवानगी देऊ शकेल. अपचा-यासदेखील त्याने दिलेल्या कागदपत्रांच्या/ साक्षीदारांच्या यादीत समाविष्ठ नसलेला पुरावा सादर करता येईल.
परंतु नवीन पुरावा सादर करणे किंवा साक्षीदारांची फेरतपासणी करणे हे सादर केलेल्या पुराव्यातील तफावत दुर करण्यासाठी अनुज्ञेय असणार नाही.
19.
शिस्तभंगविषयक प्राधिका-यातर्फे पुरावा सादर करण्याचे काम संपल्यानंतर अपचा-यास बचावाचे निवेदन सादर करण्यास सांगा. अपचा-यातर्फे देण्यात आलेल्या साक्षीदारांची तपासणी उलटतपासणी व फेरतपासणी करुन घ्या. अपचा-यास स्वत:ची तपासणी करुन घेण्याचा अधिकारी आहे.
अपचा-याने स्वत:ला तपासुन घेतले नसेले तर त्याच्या विरुध्द पुराव्यात आलेल्या परिस्थिती/ बाबीसंबंधी प्रश्न विचारुन त्या संदर्भातील माहिती घेण्याची तुमच्यावर विशेष जबाबदारी आहे हे विसरु नका नियम 8 (21)
20.
दोन्ही पक्षांकडील पुरावा सादर करण्याचे काम संपल्यानंतर चौकशी अधिकारी, सादरकर्ता अधिका-यांचे व अपचारी कर्मचा-यांचे तोंडी म्हणणे ऐकुन घेईल किंवा त्यांच्या बाजुची लेखी टाचणे सादर करण्याची परवानगी देईल. नियम 9 (21)
21.
चौकशी अधिका-याने चौकशीच्या तारखेस झालेल्या कामाची /
घटनांची नोंद घेऊन रोजनामा नित्याने लिहिणे आवश्यक आहे. अपचारी कर्मचा-यातर्फे अथवा सादरकर्ता अधिका-यांतर्फे दिल्या जाणा-या निवेदनासंबंधी तसेच त्यावर आपण दिलेल्या आदेशांची नोंद रोजनाम्यात घ्या.
22.
अपचा-याने बचावाने निवेदन दिले नाही किंवा तो आपणासमोर हजर राहिला नाही म्हणुन त्यास आरोप मान्य आहेत असे समजु नका तर अशा वेळी सादरकर्ता अधिका-यांतर्फे सादर केला जाणारा पुरावा नोंदवुन घ्या व एकतर्फी चौकशी पुर्ण करा व चौकशी अहवाल सादर करा. नियम 8 (22)
23.
एकतर्फी चौकशी सुरु झाल्यावर पुढील सुनावणीचे वेळी अपचारीहजर राहिला तर त्यास चौकशीच्या कामकाजात सहभाग घेऊ द्या व त्याच्या अपरोक्ष सादर केलेल्या पुराव्याचे अवलोकन करण्याची त्यास संधी द्या.
24.
अर्धवट सुनावणी झालेले चौकशीचे प्रकरण आपल्याकडे आल्यास चौकशीचे काम ज्या टप्यांपर्यत झाले आहेत्या टप्प्यांपासुन चौकशीचे काम सुरु करा. नियम 8
(24)
25.
चौकशीचे काम पुर्ण झाल्यावर आपल चौकशी अहवाल तयार करा. त्यात खालील गोष्टींचा अंर्तभाव करा.
A. चौकशी अधिका-याची नेमणुक आणि ज्या ज्या दिनांकास व ज्या ज्या ठिाकणी चौकशी करण्यात आली त्याचा संदर्भ देणारा प्रस्तावात्मक परिच्छेद
B. अपचा-याविरुध्दचे देाषारोप
C. अपचा-याने कबुल केलेले व शिस्तभंगविषक प्राधिकारणाने वगळलेले दोषारोप व प्रत्यक्षात चौकशी केलेले दोषारोप
D. प्रकरणातील वस्तुस्थितीचे संक्षिप्त कथा व स्वीकृत केलेले दस्तऐवज
E. बचावाचे संक्षिप्त निवेदन
F. चौकशी अधिका-याच्या निर्णयासाठीचे मुद्दे
G. प्रत्येक मुदयाच्या अनुषंगाने दोन्ही बाजुंकडुन सादर केलेल्या पुराव्याचे मुल्यमापन व त्यावरील निष्कर्ष
H. दोषारोप पत्रातील प्रत्येक दोषारोपांवरील निष्कर्ष नियम 8
(25)
26. चौकशी अहवालासोबत खाली नमुद कलेल्या संचिका पाठविण्यात याव्यात.
A. सादरकर्ता अधिकारीव अपचा-यातर्फे सादर केलेल्या कागदपत्रांची तसेच साक्षीदाराच्या नावांची सुची असलेल्या संचिका
B. ज्या क्रमाने साक्षीदाराची तपासणी करण्यात आली त्या क्रमाने साक्षीदारांच्या जबान्या अंतर्भुत असलेली संचिका
C. दैनंदिन कामाच्या रोजनिशी म्हणजे रोजनामा असलेली संचिका.
D. बचावाचे लेखी निवेदन, दोन्ही बाजुतर्फे सादर करण्यात आलेली लेखी टाचणे, चौकशी करताना सादर केले गेलेले अर्ज व त्यावरील आदेश अंतर्भुत असलेली संचिका.
27. मुळ दोषारोपापेक्षा वेगळा दोषारोप सिध्द होतो असे चौकशी अधिका-याचे मत असल्यास अशा निष्कार्षाची नोंद चौकशी अहवालात करता येईल. मात्र सदरचा दोषारोप अपचारी कर्मचा-याने मान्य केला असेल किंवा सदर दोषारोपांपासुन स्वत:चा बचाव करण्याची पुरेशी संधी त्यास दिली गेली नसेल तर अशा निष्कर्षाची नोंद करता येणार नाही.
28. चौकशी अहवालानंतर सही केल्यावर चौकशी अधिकारी कार्यमुक्त होतो व त्यानंतर त्याला अहवालामध्ये कोणताही फेरबदल करता येत नाही.
टाळावयाच्या गोष्टी (Donts’)
1. चौकशीच्या प्रकरणात आपला काही वैयक्तिक हेतु किंवा हित असेल (उदा. अपचारी कर्मचारी आपला नातेवाईक असेल किंवा चौकशीपुर्वी अपचारी कर्मचा-याने आपल्याविरुध्द तक्रार केलेली असेल किंवा अपचा-याविरुध्द आपला दुषित पुर्वग्रह झालेला असेल वगैरे) तर चौकशी न करता प्रकरण परत पाठवा.
2. कर्मचा-याचा तसेच साक्षीदाराचा जबाब नोंदताना त्यास शपथ देऊ नका.
3. पुरावा नोंदविताना फार संकुचित (Rigid) राहु नका. एव्हीडन्स ॲक्ट मधील तरतुदी विभागीय चौकशीच्या प्रकरणात लागु होत नाहीत.
4. अपचारी कर्मचा-यास पाहण्यास न दिलेली कागदपत्रे तुमचे दोषारोपांवरील निष्कर्ष काढताना विचारात घेवु नका.
5. आपल्यासमोर आलेला पुरावा लक्षात घ्या. अपचारी कर्मचा-यांसंबंधीचे इतर कागदपत्र (रेकॉर्ड) पाहु नका.
6. कर्मचा-यांचे गैरवर्तनासंबंधी निष्कर्ष काढताना नि:शंय पुरावा ({Proof beyond reasonable doubt) असा अट्टाहास ठेवु नका. विभागीय चौकशीच्या प्रकरणातील शक्यता (Preponderance of Possibility) लक्षात घेऊन निष्कर्ष काढता येतात.
7. आपण शिस्तभंगाविषयक प्राधिकरणाचे वकील नाही हे लक्षात ठेवा व काही करुन अपचा-याविरुध्द आरोप शाबित करण्याचा प्रयत्न करु नका.
8. अपचारी कर्मचा-याच्या अपरोक्ष सादरकर्ता अधिका-याबरोबर चर्चा करुन नका.
9. चौकशी अहवालात अपचारी कर्मचा-यास शिक्षा देण्याच्या संदर्भात कोणतीही शिफारस करु नका.
10. अपचारी कर्मचा-योने बचावाचे निवेदन दिले नाही किंवा तो चौकशीच्या वेळी हजर राहिला नाही म्हणुन त्यास दोषारोप मान्य आहेत व देाषी आहे असा निष्कर्ष काढु नका. तसे करणे हे पुर्णपणे बेकायदेशीर आहे.
11. चौकशी अहवालांवर सही करुन सादर केल्यानंतर त्यात कोणत्याही बदल फेरफार करु नका.
डॉ. के. आर. शिंगल
सेवानिवृत्त विभागीय सह आयुक्त, पशुसंवर्धन
महाराष्ट्र राज्य, चौकशी अधिकारी, भारत सरकार
ईमेल आयडी: drkrshingal@gmail.com
सादरकर्ता अधिका-यांसाठी मार्गदर्शक सुचना
अपचारी कर्मचा-यांविरुध्द केलेले दोषारोप, लेखी व तोंडी पुरावे सादर करुन व त्यावरुन तर्कसंगत अनुमान काढुन सिध्द करणे हे सादरकर्ता अधिका-याचे प्रथम कर्तव्य असते.शिस्तभंगविषयक प्राधिका-याची बाजु प्रभावीपणे चौकशी अधिका-यांसमोर मांडुन दोषारोप शाबित करण्याची महत्वाची जबाबदारी सादरकर्ता अधिका-यांस पार पाडावयाची असते. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 यामधील तरतुदी व चौकशीची कार्यपध्दती
यासंबंधीची संपुर्ण व बिनचुक माहिती सादरकर्ता अधिका-यास असणे आवश्यक आहे. अपचारी कर्मचा-यांविरध्दची चौकशी ठराविक वेळेत पुर्ण व्हावी या दृष्टीने चौकशीच्या प्रत्येक स्तरावर चौकशी अधिका-यास साहाय्य करणे हे देखील सादरर्ता अधिका-याचे कर्तव्य असते.
सादरकर्ता अधिका-याची कर्तव्य व जबाबदा-या कार्य आहेत याबाबत शासनाने 22/08/2014 च्या परिपत्राकान्वये सर्वसाधारण सुचना काढल्या आहेत. त्या पुढे दिलेल्या आहेत.
सादरकर्ता अधिका-यांसाठी सुचना
सोबत जोडलेल्या आदेशान्वये आपली सादरकर्ता अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. हे काम शिस्तभंगविषयक प्राधिका-याने आपणावर विश्वासने सोपिवले आहे सादरकर्ता अधिका-याचे काम हे आपल्या पदाच्या दैनंदिन कामाजापेक्षा भिन्न स्वरुपाचे असले तरी खाली नमुद केलेल्या सुचनांचे /
मार्गदर्शक तत्वांचे आपण काळजीपुर्वके पालन केल्यास हे कर्तव्य बजाविण्यात आपणास कोणतीही अडचण येणार नाही.
विभागीय चौकशीच्या प्रक्रियेचा क्रमवार विचार करता सुलभतेसाठी ही प्रक्रिया सुनावणीपुर्व टप्पा, प्राथमिक सुनावणीचा टप्पा, नियमित सुनावणीचा टप्पा व सुनावणी संपल्यांनतरचा टप्पा अशी चार ठळक भागांत विभागता येत. या प्रत्येक टप्प्यावर सादरकर्ता अधिकारी या नात्याने आपली कर्तव्ये व जबाबदा-या पार पाडताना खालील बाबी लक्षात घ्याव्यात.
अ) सुनावणीपुर्व टप्पा : या टप्प्यावर विशिष्ट प्रकारणी सादरकर्ता अधिकारी म्हणुन नियुक्ती केल्याचे आदेश आपणास प्राप्त होतात.
1. आपल्या नियुक्तीच्या आदेशासोबत खालील कागदपत्रे ही प्राप्त झाल्याची खात्री करावी.
A. दोषारोपांचे ज्ञापन व त्यासोबतची जोडपत्रे . यात ज्या कागदपत्रांच्या सहाय्याने दोषारोप शाबित करावयाचे आहेत त्यांच्या प्रती व साक्षीदारांचे पत्ते तसेच दुरध्वनी क्रमांक यांचाही समावेश असेल.
B. अपचा-यावर दोषारोपाचे ज्ञापन बजाविण्यात आल्याच्या पोचपावतीची प्रत
C. अपचा-यावर बचावाच्या निवेदनाची प्रत किंवा अपचा-याने बचावाचे निवेदन दिले नसल्यास त्याबाबतची स्पष्ट माहिती.
D. .साक्षीदारांनी जबाब/ लेखी निवेदने दिली असल्यास त्यांच्या प्रती लेखी निवेदने दिली नसल्यास त्याबबतची स्पष्ट माहती.
E. चौकशी अधिका-याच्या नियुक्तीच्या आदेशाची प्रत.
वरीलप्रमाणे सर्व किंवा त्यापैकी काही कागदपत्रे प्राप्त न झाल्यास ती शिस्तभंगविषयक प्राधिका-यांकडुन तात्काळ प्राप्त करुन घ्या.
2.
नियम 8 मधील तपशीलवार चौकशीचे टप्पे व त्या प्रत्येक टप्प्यावर करावयाची कार्यवाही समजुन घ्या. त्याबाबत काही शंका असल्यास तिचे निरसन करुन घ्या.यासंदर्भात विभागीय चौकशी नियमपुस्तिका 1991 मधील प्रकरण 6
मधील तरतुदींचे वाचन उपयुक्त ठरेल.
3. प्रत्येक दोषारोप समजुन घ्या. त्यांचे विश्लेषण करा.अपचा-याला पदाची कर्तव्ये व जबाबदा-यांची निश्चित माहिती करुन घ्या व त्या निसंदिग्धपणे समजुन घ्या. त्यापैकी कोणती कर्तव्ये व जबाबदा-यांचे पालन करण्यात आले आणि कोणत्या टप्प्यावर अपचा-याने कसुर केली त्याबाबत स्वत:ची उपलब्ध पुराव्यातुन खत्री करुन घ्या. दोषारोप वस्तुस्थिती- पुरावा यांचा परस्परसंबंध जाणुन घ्या व त्याची उजळणी करा.हे करीत असताना आवश्यकता भासल्यास प्राथमिक चौकशी करणा-या अधिका-याशी चर्चा करा.
4. अपचारी विशिष्ट दोषारोपासंबंधी कोणता बचाव करेल व त्याचा प्रतिवाद कसा करता येईल याचा विचार करुन ठेवा.
5. प्रत्यक्ष चौकशीची वार्यवाही कशी चालेल योच काल्पनिक चित्रण मनातच उभे करा. (Visualizing the transaction) म्हणजे प्रत्येक टप्प्यांवरील कामाची पुर्ण तयारी करता येईल व त्यात काही उणीव राहणार नाही.
ब) प्राथमिक सुनावणीचा टप्पा : या टप्प्यास अपचा-यास मुळ कागदपत्रे तपासण्याची व त्याची इच्छा असल्यास अधिकची कागदपत्रे मागविण्याची संधी दिली जाते.
1. सर्व साधारपणे ज्या कागदपत्रांच्या आधारे दोषारोप सिध्द करावयाचे आहेत त्यांच्या मुळ प्रति शिस्तभंगविषयक प्राधिका-यांकडुन चौकशी अधिका-याकडे पाठविल्यास जातात. त्यांचे निरिक्षण करण्याची संधी अपचा-यास महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील )
नियम 1979 च्या नियम 8
(11) मधील तरतुदीन्वये दिली जाते. तथापि अपचा-याकडुन जोडपत्र -4 मध्ये समाविष्ठ असलेल्या कागदपत्रांहुन अन्य कागदपत्रांचीही मागणी केली जाऊ शकते. अशा वेळी ती कागदपत्रे त्या प्रकरणाशी असंबध्द असल्यास तसे मत चौकशी अधिका-याकडे नोंदवा, तसेच कागदपत्रे उपलब्ध करुन दयावयाची झाल्यास ती कोणत्या अधिका-याच्या ताब्यात आहेत हे शोधण्यास चौकशी अधिका-यास मदत करा.
2. अपचा-याने मागविलेल्या वरील अधिकच्या कागदपत्रांचे निरिक्षण करण्याचा सादरकर्ता अधिका-यांस हक्क आहे. त्या कागदपत्रांचे काळजीपुर्वक निरीक्षण करा व त्यातुन अपचारी स्वत:चा बचाव काळजीपुर्वक निरीक्षण करा व त्यातुन अपचारी स्वत:चा बचाव कसा करणार आहे याचा विचार करुन तो खोडुन काढण्यासाठी स्वत:चा युक्तीवाद तयार करा.
क) नियमित सुनावणीचा टप्पा :नियमित सुनावणीच्या टप्प्यात दोन्ही बाजुंच्या साक्षीदारांची तपासणी/ उलटतपासणी केली जाते.
1. पुरविण्यात आलेल्या साक्षीदारांच्या यादीतील कोणत्या साक्षीदारांना साक्षसाठी बोलावण्याची खरोखर आवश्यकता आहे याचा विचार करा.
2. एखाद्या साक्षीदारास केवळ कागदोपत्री पुरावा सादर करण्यासाठी बोलाविण्यात आले असले आहणि त्या पुरवाव्याच्या खरेपणाविषयी संबंधित अपचा-याने कागदपत्रांच्या निरीक्षणानंतर आक्षेप घेतला नसेल तर अशा साक्षीदारस शिस्त भंगविषयक प्राधिका-याच्या मंजुरीने साक्षीतुन वगळा व तसेच चौकशी अधिका-यास कळवा.
3. तसेच प्रकरणाचे अवलोकन करुन साक्षीदारांच्या यादीत समाविष्ठ नसलेल्या आणखी काही साक्षीदारांचा समावेश करावा असे तुमचे मत झाल्यास शिस्त भंगविषयक प्राधिका-यांच्या पुर्वपरवानगीने चौकशी अधिका-यास तशी विनंती करा.
4. साक्षीदारांची भेट घ्या व त्यांना प्रकरणाबाबत अवगत करा. त्यांची भुमिका समजावुन सांगा व त्यांच्या शंकाचे निरसन करा.त्यांनी काही लेखी निवेदने दिली असल्यास ती त्यांना दाखवा.त्यांना कोणते प्रश्न विचारुन त्यांच्या कडुन कोणती माहिती काढुन घेणे अपेक्षित आहे याबाबत त्यांना स्पष्ट कल्पना दया.उलट तपासणीत अपचा-यांकडुन वा त्याच्या बचाव सहाय्यकाकडुन त्यांना विचारल्या जाणा-या संभाव्य प्रश्नांची त्यांना कल्पना दया व उत्तरांसह तयार राहण्यास सांगा.
5. तथापि एखादया मुद्याबाबत तुम्हास हवी तशीच साक्ष द्यावी असा दबाव साक्षीदारावर आणु नका.
6. साक्षीदार ठरवुन दिलेल्या ठिकाणी व वेळी हजर राहतील याची तजवीज करा.
7. साक्षीदारांची तपासणी करताना त्यांनी लेखी निवेदन दिले असल्यास ते त्यास वाचुन दाखवा व ते त्यांना मान्य आहे किंवा कसे हे विचारा. त्यांना त्यात काही माहिती समाविष्ठ करावयाची / वगळावयाची वा बदलावयाची असल्यास तशी विचारणा करा. काही वेळेस साक्षीदार तोंडी कथनही करतील. साक्षीदाराच्या लेखी निवेदनात वा त्याने केलेल्या तोंडी कथनात काही विवक्षित माहिती (जी प्रकरणात उपयुक्त आहे) समाविष्ठ झाली नाही असे आढळल्यास त्यासाठी विशिष्ठ प्रश्न त्यास विचारा.
8) आपणास शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याच्या
साक्षीदारांच्या फेरतपासणीचा हक्क आहे. हा हक्क डोळसपणे वापरला पाहिजे. अपचाऱ्याने वा त्याच्या बचाव सहायकाने शिस्तभंगविषयक
प्राधिकाऱ्याच्या साक्षीदाराच्या केलेल्या उलटतपासणीतून काही संभ्रम / संदिग्धता
निर्माण झाल्यास
ती दुर
होईल असे
प्रश्न साक्षीदारास
फेरतपासणीत विचारा.
9) काही वेळा साक्षीदार उलटण्याची शक्यता असते. त्यावेळी त्याची परिणामकारक उलट तपासणी करुन त्याची साक्ष कशी अविश्वासार्ह आहे हे सिद्ध करा.
10) बचावाच्या साक्षीदारांची उलट तापसणी करण्यासाठी खालील बाबींची तयारी करा.
क) शक्य
असल्यास बचावाच्या
साक्षीदाराची पार्श्वभूमी
माहित करुन
घ्या.
ख) ते
कोणती साक्ष
देतील याचा
विचार करुन
ठेवा.
ग) अपचारी
त्यांची तपासणी
करीत असताना
काळजीपूर्वक लक्ष
द्या. त्या
तपासणीतील विसंगती
टिपून ठेवा.
घ) वरील
मुद्यांच्या आधारे
त्यांची उलट
तपासणी घ्या.
बचावाच्या साक्षीदारांची
परिणामकारक उलट
तपासणी घेताना
आपण त्यास
विचारलेल्या प्रश्नाचे
कोणते उत्तर
अपेक्षित आहे
हे संबधित
बचावाच्या साक्षीदारास
समजू न
देणे ही
कौशल्याची बाब
आहे हे
लक्षात ठेवा.
11) सरकारी साक्षीदारांच्या तपासणीत वा फेरतपासणीत त्यांना सूचक प्रश्न (Leading questions) विचारु
नका. तसेच
बचावाच्या साक्षीदारांच्या
तपासणीत वा
फेरतपासणीत अपचाऱ्याने
/ बचाव सहायकाने
असे सूचक
प्रश्न विचारल्यास
त्यावर आक्षेप
घ्या.सरकारी
साक्षीदारांना सतावण्यासाठी
प्रश्न विचारले
जात असतील
तर त्यावर
आक्षेप घ्या.
12) साक्षीदारांची
लेखी निवेदने
आणि प्रत्यक्षात
साक्षीदरम्यान त्यांनी
केलेले कथन
यात तफावत
आहे किंवा
कसे याकडे
बारकाईने लक्ष
द्या.
13) चौकशी दरम्यान आपणास असलेल्या न्याय हक्कांची अंमलबजावणी करण्यात हयगय करुन नका. तसेच अपचाऱ्याच्या
न्याय्य हक्कास
उगाचच विरोध
करु नका.
एवढेच नव्हे
तर, अपचाऱ्यास
त्याचा न्याय्य
हक्क बजाविण्याची
संधी दिली
जात नसेल
तर ती
बाब चौकशी
अधिकाऱ्याच्या निदर्शनास
आणा, म्हणजे
केवळ तेवढयासाठी
चौकशीची कार्यवाही
देाषपूर्ण असल्याची
तक्रार त्यास
नंतर करता
येणार नाही.
14) चौकशीचे कामकाज करताना अपचाऱ्याविरुद्ध कोणताही पूर्वग्रह ठेवू नका.
15) चौकशीच्या तारखांना शक्यतो गैरहजर राहू नका आणि शुल्ल्क कारणांसाठी चौकशी पुढे ढकलण्याची मागणीही करु नका. अपरिहार्य कारणांसाठी हजर राहणे शक्यच नसेल तर शिस्तभंगविषयक
प्राधिकाऱ्याच्या मंजूरीने आपल्या वतीने अन्य एखाद्या अधिकाऱ्यास सादरकर्ता अधिकाऱ्याची
कर्तव्ये बजाविण्यासाठी
प्राधिकृत करता
येते हे
लक्षात ठेवा.
ड) सुनावणी संपल्यानंतरचा
टप्पा
: या
टप्प्यास
सादरकर्ता
अधिकाऱ्याने त्याचे लेखी टाचण चौकशी अधिकाऱ्याकडे
सोपावावयाचे असते.
1) आपल्या लेखी टाचणात संपूर्ण चौकशीच्या प्रक्रियेचा तपशिल देताना दोषारोपवस्तूस्थिती
पुरावा यांचा
परस्परसंबंध उलगडून
दाखवा.
2) अपचाऱ्याने केलेल्या बचावाचे वस्तुस्थितीच्या व पुराव्याच्या आधारे खंडन करुन शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याच्या
पुराव्याच्या आधारे
व तपासण्या आलेल्या साक्षीदारांच्या
साक्षीतून देाषारोप
कसा सिद्ध होतो ते तार्किक पद्धतीने निदर्शनास आणा.
3) सादरकर्ता अधिकाऱ्याच्या लेखी टाचणाची प्रत प्राप्त झाल्यानंतर अपचारी त्याचे लेखी टाचण सादर करतो. त्यामुळे अपचाऱ्याने त्याच्या लेखी टाचण्यात उपस्थित केलेल्या मुदृयांचा बचाव करण्यात सादरकर्ता अधिका-यास संधी मिळत नाही.याचा विचार करुन अपचा-याच्या लेखी टाचणातील संभाव्य बचाव अगोदरच विचारात घेऊन तो तुमच्या लेखी टाचणात खोडुन काढा.कोणत्याही विधानामुळे शिस्तभंगविषयक प्राधिका-याची बाजु कमकुवत होणार नाही याची दक्षता घ्या.दोषारोप सिध्द होत असल्याचे त्यात विनिर्दिष्टपणे नोंदवा.
4. विभागीय चौकशी ही गांर्भीयपुर्वक पार पाडावयाची प्रक्रिया आहे. आपण वरील कर्तव्ये व जबाबदा-या परिणामकारकरित्या पार पाडल्या तर अपचा-यावरील दोषारोप सिध्द होत असल्याचे निष्कर्ष प्राप्त होतील व गैरवर्तुक करणा-या कर्मचा-यास योग्य ती शिक्षा करणे शक्य होईल. सादरकर्ता अधिकारी या नात्याने आपली कर्तव्ये पार पाडण्यात कसुर केल्याचे आढळुन आल्यास आपणाविरुध्द शिस्त भंगाची कारवाई करण्यात येईल.
बचाव सहाय्यकासाठी मार्गदर्शक सुचना
आपल्याविरूदध करण्यात आलेले आरोप खोटे व निरागस आहेत हे दाखवून देणेसाठी अपचा-याला तोंडी व लेखी पुरावा देणे आवश्यक असते. शिस्तभंगविषयक अधिका-यामार्फत सादर केला जाणारा पुरावा खोडून टाकणेसाठी व आरोप
सिध्द करणेसाठी तपासल्या जाणा-या साक्षीदारांची उलटतपासणी करणेसाठी अपचा-यास कर्मचा-यास त्याच्या मुख्यालयातील किंवा चौकशी घेणेत येईल त्या ठिकाणच्या कोणत्याही
शासकीय कार्यालयातील ,ज्याच्याकडे या आधीच घेतलेल्या शिस्तभंगाची प्रकरणे तीन पेक्षा कमी आहेत.अशा शासकीय कर्मचा-याची बचाव सहाययक म्हणून म्हणून नेमणूक करता येते.प्रकरणातील परिस्थिती
लक्षात घेवून चौकशी अधिका-याने संमती दिली तरच इतर ठिकाणच्या कोणत्याही कर्मचा-याची (ज्याच्याकडे याआधी घेतलेल्या शिस्तभ्ंगाची प्रकरणे
तीनपेक्षा कमी आहेत.)बचाव सहाय्यक म्हणून नेमणूक करता येते.तसेच दिनांक-07.10.2015 च्या शासन निर्णयान्वये नमूद केलेल्या अटी व शर्तीस अधिन राहून सेवानिवृत्त
शासकीय कर्मचा-याची नेमणूक करता येते.त्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे.
अ) असा सेवानिवृत्त कर्मचारी राज्य शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेला असला पाहिजे.मात्र त्याचेविरूदध सेवेत असताना /सेवानिवृत्ती नंतर
कोणतीही विभागीय चौकशी झालेली
नसावी/प्रस्तावित नसावी आणि अशा
कार्यवाहीच्या अनुषंगाने त्याला कोणतीही शिक्षा झालेली नसावी.
ब) अशा सेवानिवृत्त कर्मचा-याचा प्रवास भत्ता,दैनिक भत्ता इ.खर्च अपचारी कर्मचा-यास स्वत: करावा लागेल.
क) बचाव सहाय्यक म्हणून काम करणा-या व्यक्तिने चौकशीच्या तारखांना व ठिकाणी वेळेवर हजर राहिले पाहिजे.याबाबतची जबाबदारी अपचारी कर्मचा-याची असेल.
ड) अशा सेवानिवृत्त शासकीय कर्मचा-याच्या संबधित प्रकरणाशी चौकशीच्या कोणत्याही टप्पयात अथवा
त्याच्या अधिकृत् कामाचा भाग म्हणून कोणत्याही प्रकारे संबध आलेला असता कामा नये.
इ) अशा सेवानिवृत्त शासकीय कर्मचा-यास एकाच वेळी जास्तीत जास्त पाच प्रकरणांमध्ये बचाव सहायक
म्हणून काम करता येऊ शकेल .त्यांच्याकडे पाचपेक्षा जास्त प्रकरणे नाहीत याबददल त्यांनी चौकशी
अधिकारी यांच्याकडे प्रतिज्ञापत्र दिले पाहिजे.
अपचारी कर्मचा-यांने स्वत:चा बचाव स्वत: करण्याऐवजी बचाव सहाय्यकांमार्फत करणे हे नेहमीच श्रेयस्कर असते. बचाव सहाय्यक नेमण्याची परवानगी नाकारणी म्हणजे, अपचा-यास आरोप नाकारण्याची पुरेशी संधी न देणे असा अर्थ होऊ शकतो.त्यामुळे साहजिकच राज्य घटनेच्या कलम 311 (2) मधील तरतुदीचा भंग होतो.
बचाव सहाय्य्क हे जबाबदारीचे पद असते. बचाव सहाय्यकाला महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 मधील तरतुदी तसेच चौकशीच्या कार्यपध्दतीची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.अपचारी कर्मचा-यांविरूध्द केलेल्या आरोपांपासून त्याची सुटका कशी होईल हे पाहण्याची बचाव सहाय्य्काची जबाबदारी असते. या संदर्भात बचाव सहाययकाने करावयाच्या गोष्टी व टाळावयाच्या गोष्टी पुढे नमुद केल्या आहेत.
करावयाच्या गोष्टी (Dos)
1. बचाव सहाय्य्क म्हणून काम करण्यास संमती दिल्याबरोबर, अपचारी कर्मचा-यांकडून दोषारोप पत्र, आरोपांचे विवरणपत्र, शिस्तभंगविषयक अधिका-यांमार्फत सादर केल्या जाणा-या कागदपत्रांची तसेच साक्षीदारांची यादी मागवून घेणे व कागदपत्रांचा संपूर्ण अभ्यास करणे व त्यासंदर्भात अपचारी कर्मचा-यांकडुन योग्य ती माहिती घेणे.
2. आवश्यकता असल्यास अतिरीक्त कागदपत्रांची मागणी करणे, कागदपत्रांची आवश्यकता का आहे हे मागणी अर्जात नमुद करणे गरजेचे असते.
3. सादकर्ता अधिका-यांतर्फे तपासल्या जाणा-या साक्षीदारांच्या उलटतपासणीत काय प्रश्न विचारावयाचे ते ठरवून ठेवणे तसेच साक्षीदारांची सरतपासणी केली जात असता त्यांनी दिलेल्या उत्तरातील महत्वाच्या मुददयांची नोंद करून घेणे व त्याअनुषंगाने उलटतपासणीत प्रश्न विचारणे.
4. उलटतपासणी करताना साक्षीदाराला मोजकेच प्रश्न विचारणे अनावश्यक प्रश्न विचारणे अनावश्यक प्रश्न विचारल्यास साक्षीदारांच्या योग्य उत्तराने अपचारी कर्मचारी अडचणीत येऊ शकतो.
5. साक्षीदारांच्या उलटतपासणीतून मिळालेली उत्तरे महत्वाची व निर्णयात्मक ठरतात.त्यामुळे साक्षीदारांची उलटतपासणी योग्य त-हेने व काळजीपुर्वक करणे.
6. अपचारी कर्मचा-यांतर्फे तपासल्या जाणा-या साक्षीदारांची उत्तरे, साक्षीदार अपचारी कर्मचा-यांच्या हितसंबंधी आहे असे म्हणून दुर्लक्षित केले जाण्याची शक्यता असते, हे लक्षात ठेवणे.
7. दोन्ही बाजुंच्या लेखी व तोंडी साक्षीपुरावा सादर केल्यानंतर सादरकर्ता अधिकारी व आपण सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे , आपली बाजू तोंडी मांडायची असते किंवा चौकशी अधिका-यांनी परवानगी दिल्यास लेखी टाचण दयावयाचे असते. सादरर्ता अधिका-याने प्रथम लेखी टाचण सादर करावयाचे असते व त्याची प्रत आपणास दयावयाची असते. तशी प्रत प्राप्त करा व आपले लेखी टाचण तयार करा. लेखी टाचण तयार करताना किंवा तोंडी बाजु मांडताना अपचारी कर्मचा-याची बाजु समर्थपणे मांडली जाईल हे पहाणे. थोडक्यात कर्मचा-यांविरुध्द केलेले दोषारोप खरे नाहित व ते सिध्द झालेले नाहीत तसेच अपचारी कर्मचारी निर्दोष आहे हे पटवुनदेण्याची जबाबदारी बचाव सहाय्यकाची असते हे लक्षात ठेवणे.
8. चौकशी अधिका-याने सादर केलेल्या चौकशी अहवालाची प्रत शिस्तभंगविषयक प्राधिका-यांकडुन अपचारी कर्मचा-यास प्राप्त होईल किंबहुना ती प्राप्त होण्याच्या कर्मचा-याचा हक्क असतो, हे लक्षात ठेवा.
9. चौकशी अहवालातील अपचारी कर्मचा-यास अनुकुल असतील अशा निष्कर्षाची शिस्तभंगविषयक प्राधिकारी तात्पुरत्या निष्कर्षासहित असहमत असेल तर असहमतीची कारणे देखील चौकशी अहवालासोबत अपचारी कर्मचा-यास प्राप्त होण्याचा त्याचा हक्क असतो.
10. चौकशी अहवाल व जरुर त्या प्रकरणात शिस्तभंगविषयक प्राधिका-याचे तात्पुरते निष्कर्ष विचारात घेवुन अपचारी कर्मचा-याच्या वतीने सादर करावयाचे निवेदन तयार करा व ते वेळेत शिस्तभंगविषयक प्राधिका-यास सादर होईल हे पाहा.
11. त्यानंतर शिस्तभंगविषयक प्राधिका-याने शिक्षेचा आदेश काढल्यास अपचारी कर्मचा-यास शिक्षेच्या आदेशाविरुध्द अपील करावयाचे असल्यास अपील अर्ज तयार करा. तो अर्ज शिक्षेचा आदेश प्राप्त झाल्यापासुन
45 दिवसांच्या आत तो अपीलीय अधिका-यांकडे सादर होईल हे पहा.
12. अपीलीय अधिका-यांनी अपीलाच्या वैयक्तीक सुनावणीसाठी अपचारी कर्मचा-यास पाचारण केले तर अपचारी कर्मचा-यांसोतबत हजर राहुन अपीलीय अधिका-यांसमोर अपीलीय अधिका-याने परवानगी दिल्यास कर्मचा-याची बाजु समर्थपणे मांडा.
टाळावयाच्या गोष्टी (Donts)
1.
चौकशीच्या कामात अडथळे निर्माण करु नका. असे केल्याने चौकशी अधिका-याचे मत खराब होईल.व त्यामुळे अपचारी कर्मचा-याचे नुकसान होईल.
2. सादरकर्त्या अधिका-यांशी वाद घालु नका.
3. नको ते हरकतीचे मुद्दे उपस्थित करु नका
4. रास्त कारण असल्याशिवाय चौकशीच्या तारखा पुढे ढकलाव्यात अशी विंनंती करु नका. चौकशी वेळेत पुर्ण होणे हे अपचारी कर्मचा-यांच्या हिताचे असते.
No comments:
Post a Comment